महाराष्ट्राच्या परंपरेचा महाउत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 23, 2022
- 655
28 एप्रिल ते 1 मे कालावधीत एनडी स्टुडिओत सांस्कृतिक वैभवाचे दर्शन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळच्या एनडी स्टुडिओत 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला, क्रीडा, स्वाद, संस्कृती, व्यवसाय यांचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव उलगडले जाणार आहे.
वारसा जपत या क्षेत्रात कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पुढाकाराने प्रथमच महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ’महाउत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कर्जत जवळ चौक इथल्या एन.डी.स्टुडिओच्या 47 एकरच्या विशाल जागेत दि.28 एप्रिल ते 1 मे दरम्यान हा ’महाउत्सव’ होणार असून महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरणार आहे. राज्यभरातील 5 हजार शालेय विद्यार्थी रुबिक्स क्यूब सोडवून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा साकारणार आहेत आणि हा एक विश्व विक्रम ठरणार आहे. नामवंत कलाकार यात सहभागी होणार असून त्यांनी साकारलेल्या कलाकृतिदेखील पाहायला मिळतील. चित्रकार, शिल्पकारांची प्रात्यक्षिके देखील अनुभवायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा जीवनपट उलगडणारे महाराष्ट्राचे राजे हे महानाट्य देखील सादर केले जाणार आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी लता मंगेशकर , रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रम देखील होईल. महाकला उपक्रमा अंतर्गत राज्यातील भारुड, धनगरी नृत्य, लावणी, जागरण , गोंधळ , आदिवासी कला सादर करण्यासाठी 100 हून अधिक कलाकार सहभागी होतील. ’महासंस्कृती’ द्वारे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपारिक व्यवसाय, बारा बलुतेदार, कारागिरी यांचे दर्शन घडणार आहे. ’महास्वाद’अंतर्गत राज्यभरातल्या वैविध्यपूर्ण रुचकर पदार्थांवर खवय्यांना ताव मारता येईल. चार दिवस चालणार्या या महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असून प्रवेश सर्वांना विनामूल्य असणार आहे. या संदर्भात या महाउत्सवाचे आयोजक प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai