पालिका लावणार दोन लाख झाडे
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2022
- 572
- मोरबे धरण परिसरात एक लाख तर पामबीचवर वीस हजार वृक्षांचे लक्ष
- मियावॉकी तंत्रज्ञानाने करणार वृक्षारोपण
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाल्याने येथील जंगलांच्या जागी आता विकास प्रकल्प उभे राहिले आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण वाढल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे पालिकेने पर्यावणविषयक उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली असून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरण आराखडा तयार केला जात आहे. यात जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने पामबीचवर वीस हजार झाडे लावण्यास सुरुवात केली असून पावसाळ्यात मोरबे धरण परिसरात एक लाख झाडे लावण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. ही झाडे मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात येणार आहेत.
शहरात जास्तीत जात झाडे लावून पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याकडे पालिकेने भर देण्यास सुरुवात केली आहे. यात जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर दिला जाणार असून मियावॉकी तंत्रज्ञानाने देशी झाडांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होत असल्याचे दिसून आले आहे. कोपरैरणे येथील निर्सग उद्यान व ऐरोली येथील नक्षत्र उद्यानात या तंत्रज्ञानाने झाडे लावण्यात येत असून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या पामबीच मार्गावर वीस हजार झाडांचे जंगल तयार केले जात आहे. याच परिसरात आणखी झाडे लावली जाणार असून घणसोली येथील गवळी देव डोंगर, रबाले येथील निब्बाण टेकडी, पारसिक हिल, येथील मोकळया जांगावर एक लाख झाडे लावली जाणार आहेत. नवी मुंबईतील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावल्यानंतर पालिकेच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरण परिसरात मोठया प्रमाणात वृक्षसंपदा निर्माण करण्यास वाव असल्याने या ठिकाणी सौर उर्जा प्रकल्पाबरोबरच एक लाख झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली असून यंदा दोन लाख झाडे आणि त्याचे संवर्धनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
नवी मुंबईत केवळ आठ लाख वृक्षसंपदा आहे. पामबीच, मोरबे व्यतिरिक्त नवी मुंबईच्या शहरी, ग्रामीण व झोपडपट्टी भागात उर्वरित 80 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. घणसोली येथील गवळी देव व निब्बाण टेकडी परिसरात ही झाडे लावली जाणार आहेत. नवी मुंबईत सिडकोने यापूर्वी दोन लाख झाडे लावली होती. पालिकेने यात दरवर्षी भर घातली आहे. कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर पाच हजार झाडे जपानच्या मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ही झाडे चांगल्या प्रकारे जगल्याने याच तंत्रज्ञानाने ही दोन लाख झाडे लावण्यात येणार आहेत. संगोपण करण्याची जबाबदारी काही संस्था व व्यक्तीवर दिली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai