मियावाकीने वाढवणार हरितक्षेत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2022
- 668
पनवेल ः महापालिका क्षेत्रात प्रभाग 19 मध्ये कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे लावणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित करण्याच्या प्रकल्पाला विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यात येणार असून महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्या प्रकल्पामुळे परिसर हिरवागार तर होईलच शिवाय पशूपक्षांचा अधिवास वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पनवेल शहरातील भुखंड क्र. 273 वरील क्षेत्रावर डेंस ग्रीन मियावायी वन उभारण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. पालिकच्या बायोगॅस प्रकल्प असणार्या ठिकाणी सुमारे एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर हे वन उभारले जाणार आहे. यामध्ये सुमारे पाच हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल संस्थेकडून स्वखर्चाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पूर्वाश्रमीच्या नगरपरिषदेमार्फत सहा वाणिज्य संकुलातील 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करणे या विषयाला मान्यता देण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यावेळी सहा व्यापारी संकुलातील 355 व्यापारी गाळे विद्यमान गाळेधारकांस तत्कालीन नगरपरिषद कायद्याप्रमाणे निविदा पद्धतीने व आरक्षणानुसार वाटप केल्याची माहिती उपायुक्तांनी दिल्यावर त्याला नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा विरोध नोंदवून मान्यता देण्यात आली.
- रोटरी क्लब करणार झाडांची देखभाल
1. पनवेल महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड क्रमांक 273 हा डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ, पनवेल सेंट्रलला देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
2. यात हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी पालिका कोणताही मोबदला देणार नाही.
3. वृक्षारोपणाच्या आराखड्यास महापालिकेची परवानगी घ्यायची असून झाडांची देखभाल अकरा महिने रोटरी क्लबने विना मोबदला करायची आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai