गणेश नाईकांना उच्च न्यायालयाचा दिलासा
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2022
- 1075
- अटकपूर्व जामीन मंजूर
नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. बलात्कार, फसवणुकीच्या आरोपांखाली गणेश नाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन नाईक यांच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच महिलेने नाईकांनी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाने तारीख पे तारीख देत शनिवारी नाईकांचा अटकपुर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गणेश नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अखेर आज (ता. 4) अटकपुर्व जामीन मंजुर करुन नाईकांना दिलासा दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai