नोडनिहाय इंग्रजी शाळेसाठी चाचपणी
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2022
- 643
पालिकेकडून सर्वेक्षण सुरु ; परवानगीच्या प्रस्तावाची तयारी
नवी मुंबई : राज्यात इतर ठिकाणी पालिका व जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या खालावत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मात्र पटसंख्या वाढत आहे. पालिकेने गेल्यावर्षीपासून सुुरु केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे.
नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या आता पंधरा लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे आढळून आले आहे. सध्या पालिकेच्या दिघा ते दिवाळे या क्षेत्रात एकूण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणार्या 72 शाळा असून यात 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवी मुंबई पालिकेने या विद्यार्थ्यांसाठी अनेक अद्ययावत सेवा सुविधा दिलेल्या आहेत, हे पटसंख्या वाढण्यामागेदेखील प्रमुख कारण आहे. वाढती विद्यार्थी संख्या आणि बदलता शैक्षणिक कल पाहाता पालिकेने कोपरखैरणे व नेरुळ येथे दोन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा सुरू केलेल्या आहेत. या शाळांनादेखील चांगला प्रतिसाद लाभत असल्याने या वर्षी या दोन शाळांमध्ये आणखी भर घालण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मराठी आणि सीबीएसई शाळांबरोबरच राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या देखील पालिका वाढविणार आहे. सध्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. त्यात यंदा चार ते पाच शाळांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी परवानगीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.
शहरातील सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाट शुल्क घेत असल्याने त्या ठिकाणी या गरीब पालकांना पाल्यासाठी प्रवेश घेणे मुश्कील आहे. त्यामुळे या बेकायेदशीर शाळांना पर्याय उपलब्ध करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. नोड तेथे इंग्रजी शाळा अशी संकल्पना राबविली जाणार आहे. शाळा बांधण्यासाठी लागणार्या भूखंडासाठी पालिकेला सिडकोवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेला हे मिशन अधिक सक्षमपणे राबविण्यास अडथळे येत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai