वाशी रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- May 10, 2022
- 735
आठ दिवसांत 70 जणांना लाभ
नवी मुंबई : पालिका रुग्णालयात काही आरोग्य साम्रगीच्या अभावामुळे कोरोनाकाळात नागरिकांना जास्त पैसे खर्चुन खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करण्याकरिता पालिकेने टप्प्याटप्प्याने स्वतःची आरोग्य सामग्री उभारली. आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने ही यंत्रणा सर्व आजारांच्या रुग्णांसाठी वापरात काढण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
वाशी रुग्णालयात यापूर्वी एका खासगी संस्थेच्या मदतीने पालिका सीटी स्कॅन सुविधा देत होती. कोरोनाकाळात 1.90 कोटी सामाजिक दायित्व निधीतून सीटी स्कॅन यंत्रणा घेण्यात आली होती. सिडको प्रदर्शनी केंद्रात आतापर्यंत करोना रुग्णांसाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. मात्र आता करोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याने ही यंत्रणा पालिकेच्या मध्यवर्ती वाशी रुग्णालयात हलवण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिकेची स्वत:ची ही सेवा सुरू झाली आहे. यामुळे सीटी स्कॅनसाठी गरीब रुग्णांना भुर्दंड आता बसणार नाही. ही सेवा आठ दिवसांपासून सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 70 गरीब रुग्णांना याचा लाभ झाला आहे. आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली सीटी स्कॅन सुविधा महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा वाशी रुग्णालयात सुरू झाली आहे लाखो रुग्णांचा फायदा होणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, बीपीएल नागरिक, अपंग यांना ही सुविधा मोफत मिळणार असून तीन लाखांच्या आतील उत्पन्न असलेल्यांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. कोव्हिड काळात उभारण्यात आलेल्या यंत्रणा आता इतर आजारांच्या रुग्णांसाठी वापरता येत आहेत. यातील महत्त्वाची सुविधा म्हणजे नेरुळ येथील प्रयोगशाळा असून तीही पुढील काळात सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai