लीना गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून भरणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2022
- 610
खारघर : पनवेल महानगर पालिकेने नगरसेविका लीना गरड यांना मालमत्ता कर भरण्यासाठी विशेष नोटीस बजावल्यानंतर खारघर कॉलनी मधील रहिवासी एकत्र लोकसहभागातून मालमत्ता कर भरण्याचा ठराव पारित केला. यावेळी खारघर, कामोठे, कळंबोली मधून विविध सामाजिक संघटना, सोसायटी मधील पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक लढवणार्या उमेदवारांना संपूर्ण मालमत्ता कर भरल्या शिवाय निवडणूक लढविता येत नाही. त्यात नगरसेविका लीना गरड ह्या विद्यमान असल्यामुळे 31 मे पूर्वी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. दरम्यान पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सहीने गरड यांना फेब्रुवारी महिन्यात नोटीस पाठवून विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा करून पावती सचिव विभागाकडे सादर करण्यात यावे अशा प्रकारची नोटीस दिली होती, दरम्यान लीना गरड यांनी दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच दुहेरी मालमत्ता करांचा भरणा करणार नाही असा ठाम निर्धार केला होता. लीना गरड यांनी सत्ताधार्यांनी लावलेल्या बेकायदेशीर मालमत्ता कर प्रणाली विरोधात सातत्याने बैठका, उपोषण, रॅली, रथ, सोसायटी बॅनरच्या माध्यमातून मोठा लढा उभारला. त्या लढ्याला नागररिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळेच सिडको कॉलनी परिसरातील अजूनही मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरलेला नाही.
दरम्यान गरड यांनी 31 मे पूर्वी मालमत्ता कर न भरल्यास येणारी निवडणूक लढविता येणार नसल्याची माहिती कॉलनी मधील काही राहिवाशांना समजल्यावर बैठक घेवून लीना गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून भरण्याचा ठराव पारित केला. कॉलनी वासीयांनी एकमताने पारित केला ठराव मंजूर करून लीना गरड यांनी जनतेसाठी लढत रहावे, यासाठी आलेल्या नागरिकांनी, आपल्या सोसायटी मधील प्रत्येक घरातून, स्वेच्छेने 1 रुपया पासून ते 10 रुपया पर्यन्त लोक वर्गणी करून मालमत्ता कर लोकसहभागातून 31 मे पूर्वी भरण्याचा ठराव पारित केला. या बैठकीला कॉलनी मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai