सरकारचे वृक्षतोड चौकशीचे आदेश
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 03, 2022
- 685
प्रधान सचिवांच्या अहवालाकडे लक्ष
नवी मुंबई ः टीटीसी औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी 2829 झाडांपैकी 300 झाडांची कत्तल आणि उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्याची नोटीस एमआयडीसीने प्रसिद्ध केली आहे. या नोटीसीच्या कायदेशीर बाबींची पुर्तता न करता सरसकट झाडांची कत्तल संबंधित ठेकेदाराने सुरु केल्याने मोठा गदारोळ पर्यावरणप्रेमींनी उठवला आहे. याची दखल राज्यसरकारने घेत एमआयडीसीचे प्रधान सचिव बलदेव सिंग यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने ठेकेदारासह अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पामबीच मार्गावरील उड्डाणपुलासाठी पालिका 391 झाडे तोडणार असल्याने गेला महिनाभर नवी मुंबईचे वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीस प्रचंड विरोध केला आहे. ठिकठिकाणी याबाबत आंदोलने सुरु असून त्यात एमआयडीसीच्या झाडे तोडण्याच्या नोटीसीने भर घातली आहे. टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एमआयडीसीने हाती घेतले असून या कामात अडथळा ठरणार्या 617 झाडांची कत्तल आणि 2212 झाडांच्या पुनर्रोपणाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्या क्षेत्रात ही झाडे तोडायची आहेत तेथील वर्तमानपत्रात जाहिरात न देता ती ठाण्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. शासनाच्या नगरविकास विभागाच्या 2022 मधील निर्देशानुसार 200 पेक्षा जास्त झाडांची कापणी करायची असेल तर त्याची परवानगी राज्य वृक्षप्राधिकरणाकडून घेणे बंधनकारक आहे.
एमआयडीसीने याबाबत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता त्यांच्या कंत्राटदाराने झाडांची सरसकट कत्तल करण्यास सुरुवात केली. याबाबत पर्यावरण प्रेमी आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर आपल्याला झाडांच्या सुरु असलेल्या तोडकामाबद्दल माहिती नसल्याची भुमिका कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांनी घेतली. राठोड यांच्या या भुमिकेमुळे नवी मुंबईत प्रचंड नाराजी पसरली असून यापुर्वी दगडखाणींमुळे डोंगर बोडके झाले असून त्याचा फटका नवी मुंबईतील पर्यावरणाला बसला आहे. त्यातच गेल्या तीस वर्षात वाढ झालेल्या तीन हजार झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची भिती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. ठेकेदाराने विनापरवाना झाडे तोडण्यास सुरुवात केल्यावरही कार्यकारी अभियंता राठोड यांनी कोणतीही कारवाई न केल्याने याबाबतची तक्रार थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एमआयडीसीचे प्रधान सचिव सचिव बलदेव सिंग यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- राठोड यांच्या अडचणीत वाढ?
ठेकेदाराने विनापरवाना झाडे तोडण्यास सुरुवात केल्यावरही कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याविरोधात आवाज उठवल्यावर आपल्याला झाडांच्या सुरु असलेल्या तोडकामाबद्दल माहिती नसल्याची भुमिका राठोड यांनी घेतली. त्यांच्या भुमिकेमुळे नवी मुंबईत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे या वृक्षतोड प्रकरणी राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai