झाडांसाठी भाजप-राष्ट्रवादीचे आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2022
- 564
नवी मुंबई : वाशी महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी 391 झाडांची कत्तल होणार असल्याने या प्रकल्पाला नवी मुंबईकरांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. या वृक्षतोडीविरोधात रविवारी पर्यावरणदिनी झाडे वाचवण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली ते वाशी अरेंजा कॉर्नपर्यंत लाँग मार्च काढला. तर दुसरीकडे आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात वाशीत अरेंजा कॉर्नरजवळ चिपको आंदोलन केले.
शहरात वाशी अरेंजा कॉर्नर ते कोपरी येथील 362 कोटींचा अनावश्यक असलेला उड्डाणपूल व त्या उड्डाणपुलासाठी 391 झाडांचा बळी घेण्याच्या प्रकल्पावरून नवी मुंबईतील राजकीय वातावरण गेले 15 दिवस तापलेले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीवरून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने लक्ष्य केले असून गरज नसताना ह्या उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण लुटले; परंतु नवी मुंबईची लूट या राज्यातील सत्ताधार्यांना करू देणार नसल्याचा इशारा नाईक यांनी दिला. महाविकास आघाडीने व नगरविकास मंत्र्यांच्या आशीर्वादाने शहराला आवश्यक नसलेली कोट्यवधींची कामे काढली. नवी मुंबईकरांच्या सुविधासाठी आरक्षित असलेले भूखंड हडप करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप त्यांनी केला. कोणतीही चुकीची कामे या शहरात खपवून घेतली जाणार नसून हे अनावश्यक प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली व नवी मुंबईतील एकाही झाडाला हात लावला तर याद राखा, असा इशारा नाईक यांनी दिला. तर ज्या अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलावरुन आता जे नेते लाँग मार्च काढत आहेत त्यांचीच एकहाती सत्ता नवी मुंबई शहरात असताना हा उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आता करत असलेला विरोध हे नाटक आहे. त्यामुळे नाईकांनी प्रत्येक झाडासमोर जाऊन माफी मागितली पाहिजे असे आव्हाड यावेळी म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai