पालिकेच्या जलकुंभाला तडे
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 08, 2022
- 660
आयआयटीच्या अहवालात वास्तू धोकादायक घोषित
नवी मुंबई ः अठरा वर्षापुर्वी बांधलेला जलकुंभ धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात सदर जलकुंभाच्या स्लॅबला तडे गेल्याने त्यावरील वास्तू तोडण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. सदोष काम करणार्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.
नवी मुंबई महापालिकेने 2007 साली 221 कोटी रुपये खर्च करुन मोरबे धरण ते पारसिक हिल येथे पाणी आणण्याचे काम मे. प्रतिभा इंडस्ट्रिजला दिले होते. यामध्ये बेलापुर सेक्टर 28 येथे पारसिक हिलच्या पायथ्याला जलकुंभ बांधून तेथून पंपाने पाणी पारसिक हिलवरील जलकुंभात नेऊन गुरुत्वाकर्षण शक्तीने सदर पाणी नवी मुंबईला पुरवण्याची पालिकेची योजना होती. यासाठी पारसिक हिलच्या पायथ्याला मोठा जलकुंभ बांधण्यात आला होता.
या जलकुंभावर पालिकेने स्काडा प्रणालीच्या देखभालीसाठी मोठे अनधिकृत कार्यालय बांधले होते. या कार्यालयाच्या बांधकामासाठी मोठे लोखंडी गर्डरचा वापर करण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने या जलकुंभाच्या स्लॅबला तडे गेल्याचे निदर्शनास आले. हे तडे सदर स्लॅबवर अतिरिक्त वजन ज्याठिकाणी ठेवण्यात आले होते तेथेच निर्माण झाल्याने पालिकेने हे स्काडा प्रणालीचे कार्यालय तोडण्याचा निर्णय घेतला. पालिकेला या जलकुंभावरती नव्याने स्लॅब टाकावा लागणार असून त्याचा नाहक खर्च पालिकेला बसणार आहे. त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले स्काडा प्रणाली देखरेखीचे कार्यालय आणि त्यातील सामान खराब झाल्याने त्यावरही लाखो रुपये नव्याने खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे टाकीच्या स्लॅबवर शेकडो टन लोखंडी गर्डर वापरुन स्काडा नियंत्रण प्रणाली कार्यालय उभारण्याचा तुघलकी निर्णय घेणार्या अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai