पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2022
- 722
नवी मुंबई ः शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक असले पाहिजे यादृष्टीने नियोजन करावे अशाप्रकारे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निर्देशानुसार नियोजन करित शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
शाळा सुरु होताच नव्या इयत्तेच्या नव्या पुस्तकांचे अप्रुप प्रत्येक विद्यार्थ्याला असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील ही असुप्त इच्छा लक्षात घेऊन आयुक्तांनी तशाप्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने एक महिना आधीपासूनच पाठ्यापुस्तक मंडळाकडे आपली मागणी नोंदविली होती. केवळ मागणी नोंदवून न थांबता त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या 53 प्राथमिक शाळांतील मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य झाले.
अशाचप्रकारे महानगरपालिकेच्या 24 माध्यमिक शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुस्तके खरेदी करून पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे सीबीएसई बोर्डाच्या 2 महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नवनीतकडून पुस्तके घेऊन वितरित करण्यात येतात. याबाबतची प्रक्रिया देखील लवकर सुरु करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करीत शाळा सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच पाठ्यपुस्तके उपलब्ध करून घेण्यात आली. पाठ्यपूस्तकांची मागणी नोंदवितानाच त्याचे शाळानिहाय वितरण करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची सुयोग्य अंमलबजावणी पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर लगेचच करण्यात आली व पाठ्यपुस्तकांचे केंद्रनिहाय वितरण करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai