अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2022
- 856
मुंबई : अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मुंबईच्या राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रंगभूमीवरचा हसता-खेळता नट काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे कलाविश्वाचं मोठं नुकसान झाले आहे.
प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेने देखील प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं. एवढंच नाही तर ‘महाराष्ट्राची जत्रा’ कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना पोट धरुन हसण्यास भाग पाडले. आपल्या कामातून सर्वांना हसवणारे प्रदीप पटवर्धन आता मात्र मनाला चटका लावून गेले आहेत.
- प्रदीप पटवर्धन यांचे सिनेमे
‘एक फुल चार हाप’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बोरीज’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘थँक यू विठ्ठला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai