सिडकोच्या भूखंड विक्रिला हरित लवादाची स्थगिती
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 24, 2022
- 559
नवी मुंबई ः शहरात सिडकोने सुरु केलेली भूखंड विक्री वादात सापडली आहे. यातील काही भूखंड सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. नेरूळ येथील सुमारे 25 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भव्य भूखंड सिडकोने निविदा प्रक्रिया राबवून विक्रीस काढला आहे. हा भूखंड सीआरझेड 1 प्रकारात येत असल्यामुळे त्याला नवी मुंबई एन्व्हार्यनमेंट प्रिझर्वेशन सोसायटीने विरोध करीत हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन विक्री प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने सिडकोला देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी सिडकोने नेरूळ आणि उलवे नोडमधील भूखंड विक्रीस काढले आहेत. त्यापैकी काही भूखंड हे सीआरझेड 1 व 2 मध्ये मोडतात. सीआरझेड 1 मध्ये बांधकाम करता येत नाही. बांधकाम करायचे असल्यास संबंधितांना पर्यावरण विभागाचा ना हरकत’ दाखला आणावा लागतो. ही बाब लक्षात घेत सिडकोने निविदेच्या जाहिरातीमध्ये स्पष्ट केले आहे; परंतु सीआरझेडमधील भूखंड विक्रीस काढून सिडको ग्राहकांची फसवणूक आणि पर्यावरणाची हानी पोहोचवणार्यांना प्रोत्साहन देत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिडकोच्या नेरूळ येथील सेक्टर 54, 56 आणि 58 येथील भूखंड क्रमांक 2 ए या विरोधात पर्यावरणवाद्यांनी दोन याचिका राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे केल्या होत्या. त्यावर हरित लवादाने सिडकोला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 28 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. हरित लवादाच्या या निर्देशांमुळे सिडकोला निविदा प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. मात्र, सोमवारी दुपारी भूखंडासाठी सादर केलेल्या किमतीच्या निविदा सिडको कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आल्या. हरित लवादाने दिलेल्या निर्देशांची माहिती नसल्याचे सिडकोच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
- ऐरोलीतील भूखंड विक्रीला विरोध
सिडकोने नव्याने काढलेल्या भूखंड विक्रीलाही पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला आहे. ऐरोली सेक्टर 19 येथे एक हजार 278 चौरस मीटरच्या भूखंडाला सिडकोला पर्यावरणवादी गटांनी विरोध दर्शवला आहे. कोपरखैरणे, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथे ई-निविदा कम ई-लिलावासाठी काढलेल्या 14 भूखंडांची नवीन लॉटरी काढली आहे. यातही बोली लावणार्यांना सीआरझेड मंजुर्या घ्याव्या लागतील, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोची मालकी नसलेले भूखंड विकण्याचे नियोजन वारंवार करत राहिल्याबद्दल सिडकोवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या पर्यावरणवाद्यांनी पुन्हा केंद्र आणि राज्य सरकारकडे तक्रार करून किनारी क्षेत्रे वाचवण्याची मागणी केली आहे. सिडकोला परवानगी देऊ नये, अशी मागणी नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाला केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai