नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2022
- 615
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सेक्टर 26 नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक यांच्या सहभागाने नवी मुंबई इको क्नाईट्स तसेच तृतीयपंथीयांकडून परिसर स्वच्छता असे अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना इंडियन स्वच्छता लीग हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्यामध्ये देशातील 1800 हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने 17 सप्टेंबर रोजीचा सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता दिवस या पंधरवड्यात स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी ‘कचरा विरोधात युवक’ ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नवी मुंबई इको क्नाईट्स या नावाने समस्त नवी मुंबईकर नागरिकांचा संघ जाहीर करण्यात येत असून या संघाचे वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. या बोधचिन्हामध्ये नवी मुंबईची इको सिटी म्हणून ओळख दृढ करणार्या फ्लेमिंगो पक्षाच्या रेखाकृती चितारण्यात आल्या असून आयकॉनिक वास्तू म्हणून नावाजल्या जाणार्या नवी मुंबई महानगरपालिकेचे रेखाटन समाविष्ट आहे. प्रत्येक नागरिकाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवरील लिंकवर (हींींिी://ळपर्पेींरींशळपवळर.ाूर्सेीं.ळप/ीुरलहर्हूेीींहीरश्रश्रू/) नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्तांनी केले.
17 सप्टेंबर रोजी सेक्टर 26, नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात इंडियन स्वच्छता लीगच्या विशेष कार्यक्रमात पालिका क्षेत्रातील 250 हून अधिक शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन शाळा, महाविद्यालये यांची स्वच्छता विषयक स्पर्धाही घेतली जाणार होती. मात्र अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर रोजी होणार नाहीत. या उपक्रमांची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. हे शाळा, महाविद्यालयांचे समुह कचर्याचे निर्मितीच्या ठिकाणीच 3 प्रकारे वर्गीकरण, सिंगल युज प्लास्टिकला प्रतिबंध तसेच स्वच्छता असे 3 विषय वेशभूषा, घोषवाक्ये अथवा इतर कल्पक रितीने प्रदर्शित करतील व त्यामधील वेगळेपणानुसार त्यांचे गुणांकन करून सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणार्या, उपस्थिती दर्शविणार्या 3 शाळा, महाविद्यालयांना विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
इंडिया वर्सेस गार्बेज ही केंद्र सरकारमार्फत या लीगसाठी दिलेली टॅगलाईन असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता विषयक अधिक चांगले काम करीत राहणे हेच आपले उद्दिष्ट असून त्यादृष्टीने इंडियन स्वच्छता लीगमध्ये प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून नवी मुंबई इको क्नाईट्सचे योध्दे म्हणून आपले स्वच्छतेचे मानांकन उंचाविण्याचे उद्दीष्ट साध्य करूया. - आयुक्त अभिजीत बांगर
- तृतीयपंथीयांचाही सहभाग
पामबीच मार्गावर 7500 मीटर मानवी साखळीव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव आणि खारफुटी परिसराची स्वच्छता तसेच मिनी सी शोअर वाशी येथे तृतीयपंथीय नागरिकांकडून परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai