शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 14, 2022
- 563
46 बांधकामे पालिकेच्या रडारवर ; खरेदी व्यवहार न करण्याचे आवाहन
नवी मुंबई ः कररोनाकाळातील लॉकडाउनचा फायदा घेत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत. त्यामुळे पालिकेने अशा 46 बांधकामांची यादी तयार केली आहे. अनधिकृत बांधकामे करणार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय अशा इमारतींत गृहखरेदी आणि व्यवहार न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरातील 46 अनधिकृत बांधकामांची यादी पालिकेने प्रसिद्ध केली आहे. संबंधीत बांधकाम धारकांना एमआटीपी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. या इमारतींमध्ये घरे, दुकाने खरेदी करू नयेत असे आवाहन केले असून नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. सर्व विभागांमध्ये नियमीतपणे अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास संबंधीतांना नोटीस दिली जात आहे. वेळ पडल्यास गुन्हेही दाखल केले जात आहेत. यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात शहरातील 46 बांधकामांना नोटीस देण्यात आली आहे. विकासक व अनधिकृत बांधकाम धारकाचे नाव, अनधिकृत बांधकामाचा पत्ता, किती बांधकाम केले आहे, संबंधीतांना कधी नोटीस पाठविण्यात आली आहे याचा तपशील मनपाने प्रसिद्ध केला आहे.
या इमारतींत नागरिकांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. खोटी प्रलोभणे दाखवून व स्वस्त दरात अनधिकृत इमारतीमधील घरे विकली जात आहेत. सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई ही घरे खरेदी करण्यासाठी खर्च करत आहेत. अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असते. यामुळे घरे खरेदी करताना योग्य शहानिशा करावी असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच पालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये अशी सूचना ही केली आहे.
- विभागानुसार अतिक्रमणे
बेलापूर - 3, नेरूळ 3, वाशी 1,तुर्भे 8, कोपरखैरणे 13, घणसोली 14, ऐरोली 4, तुर्भे सेक्टर 19 मधील भूखंड क्रमांक 15 व 16 येथै वेअर हाऊसच्या जागेवर रूम बनवून लॉजींगचा व्यवसाय सुरु आहे. सेक्टर 19 ई भूखंड क्रमांक 47 वर हॉटेल सुरु करण्यात आले आहे. सेक्टर 19 ए मधील भूखंड क्रमांक 43 वरही लॉजींगचा व्यवसाय सुरु असून या बांधकामांनाही महानगरपालिकेने नोटीस दिली आहे. - कारवाईची मागणी
ऐरोली गाव, रबाळे, घणसोली येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने भूमाफिया यांचा वावर वाढला असून स्थानिक नेत्याच्या आशिर्वादाने कोणत्याही शासकीय परवानगी विना 4-5 मजली टोळेजंग इमारती उभ्या राहत असल्याचा आरोप करुन या विरोधात भाजपा पक्षाने आवाज उठवला आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील साई कॉलनी बीट भट्टी व घणसोली गोठवली गांव येथील 5 मजली अनधिकृत इमारत जमीन दोस्त करण्यात यावी व संबंधित विकासक यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे. या मागणीचे पत्र भाजपा दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकूर व सोशल मीडिया अध्यक्ष नवी मुंबई योगेश अभंग शिंदे यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai