1458 हेक्टर जमीन राखीव वने घोषित
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 04, 2022
- 717
नवी मुंबई ः खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात वाढणार्या कांदळवनावर अनधिकृतपणे डेब्रीजचा भराव टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येत असल्यामुळे कांदळवन नष्ट पावत चालले आहे. याची दखल घेत ठाणे तालुक्यातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे हटवित त्या ठिकाणी भूमाफियांना जरब बसावी यासाठी राखीव वने घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार नवी मुंबईतील एक हजार 458 हेक्टर जमीन राखीव वने म्हणून घोषित करण्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना पारित करण्यात आली आहे.
नदी, खाड्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो अशा ठिकाणी खारफुटी, कांदळवनांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेलचे समुद्रकिनारे, नद्या, खाड्या या ठिकाणी दुर्मिळ खारफुटी व कांदळवने मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. खार्या पाण्यात प्रचंड वेगाने नैसर्गिकरित्या वाढणार्या झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. या खारफुटींच्या तिवरांची झाडे व कांदळवनांमुळे समुद्र वनस्पतीमुळे समुद्रकिनार्याची मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याचे कामही होते. अशा या मानवी जीवनाला व पर्यावरणाला मदत करणार्या दुर्मिळ खारफुटी व कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. खारफुटी व कांदळवनांच्या वाढत्या कत्तलीमुळे पर्यावरण अधिकच धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील सरकारी जमिनींवरील कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
- अंतिम अधिसूचना
नवी मुंबईतील एक हजार 458 हेक्टर जमीन राखीव वने म्हणून घोषित करण्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना पारित करण्यात आली आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील 350 हेक्टर जमीन तर मिरा-भाईंदर क्षेत्रातील एक हजार 36 हेक्टर जमीन राखीव वने म्हणून घोषित करण्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai