सुशासन नियमावलीकरीता अलर्ट सिटिझन्स फोरमच्या सूचना
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 19, 2022
- 591
नवी मुंबई ः शिंदे-फडणवीस सरकारने सामान्य नागरिक नजरेसमोर ठेवून आदर्श कार्यप्रणाली आणि लोकाभिमुख शासन नियमावली निर्माण करण्यासाठीचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय कामात सुसुत्रता, पारदर्शकता आणण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. सदरील सुशासन नियमावली निर्माण करताना जनतेचे मत विचारत घेणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई अलर्ट सिटिझन्स फोरमच्या वतीने पत्राद्वारे सामान्य नागरिकांच्या सूचना व मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सादर केले आहे.
नागरिकाभिमुख प्रशासनाचे स्वप्न प्रत्यक्ष कारभारात उतरावयाचे असेल तर प्रशासनात कालसुसंगत बदल करण्याबरोबरच त्यात मानवी हस्तक्षेपाला कमीत कमी वाव उरेल यासाठीच्या उपाययोजना योजणे अत्यंत निकडीचे आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई अलर्ट सिटिझन्स फोरमने आपले मत मांडले आहे. नोकरशाहीचे वेतन बायोमेट्रिक हजेरीशी जोडावे, संगणकीय पद्धतीने बदल्यांचा कायदा करावा, ऑनलाईन सुविधांस प्राधान्य गरजेचे आहे. तसेच सेवा हक्क हमी आणि दप्तर दिरंगाईच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ऑनलाईन अर्ज सुविधा अनिवार्य करा, शासनाच्या वेबसाईट, लोकप्रतिनिधी-अधिकार्यांचे मेल आयडी अधिकृत करत त्यांचे सुसूत्रीकरण, सुलभीकरण करा, फीडबॅक सिस्टीम सुरु करावी, आरटीआय पोर्टल परिपूर्ण असावे, अर्जाचे प्रमाणीकरण करावे, माहिती अधिकाराच्या बळकटीकरणासाठी माहिती अधिकारांतर्गत दिली जाणारी माहिती पब्लिक डोमेनवर अपलोड करण्याचा नियम असावा, ग्रामपंचायत ते महानगरपालिकांचा कारभार जनतेसाठी पब्लिक डोमेनवर खुला करा, कालबाह्य नियम-कायद्यांचे कालसुसंगत पुनरावलोकन निकडीचे असून गोपनीय अहवाल वस्तुनिष्ठ असावा, अनावश्यक कामावरील निधीला चाप हवा, लोकप्रतिनिधी निधीचा लेखाजोखा खुला हवा, भविष्यात नगरसेवक,आमदारांना दिल्या जाणार्या निधीच्या विनियोगाचा लेखाजोखा जनतेसमोर उपलब्ध करणे अनिवार्य करावे, फॅमिली पेन्शन योजना सुलभ करा, सुयोग्य नियोजनसह शैक्षणिक कॅलेन्डर फिक्स करा, ‘ई -फाईल ट्रॅकींग कार्यपद्धती अंमलात आणावी, अर्जाचे स्वरूप सुलभ असावे, जिल्हानिहाय विकासाचे तटस्थ ऑडिट गरजेचे, ऑनलाईन एफआयर /तक्रार करण्याची सुविधा हवी, लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण आवश्यक, राजकीय पदासाठी किमान शिक्षणाची अट निश्चित करावी आणि त्याच बरोबर निवडून येणार्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करावी, आपले सरकारचे नागरिक संपर्क केंद्र परिपूर्ण असायला हवी तसेच 100 टक्के ऑनलाईन पद्धती अंगीकारावी अशा सूचना त्यांनी पत्राद्वारे मांडल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai