पालिका रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 24, 2022
- 582
नवी मुंबई ः महानगरपालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रूग्णालय हे सर्वसाधारण नागरिकांसाठी महत्वाचा वैद्यकिय आधार असून याठिकाणी दररोज मोठ्या संख्यने रूग्ण विविध आजारांवरील उपचारांसाठी येत असतात. नुकतीच या रूग्णालयामध्ये एक अत्यंत गुंतागुतीची पाठीच्या दुखण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अनेक वर्षानंतर पालिका रुग्णालयात अशी कठिण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली असून आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.
64 वर्षांच्या एका व्यक्तीला मागील 2 वर्षांपासून पाठदुखी आणि पाठीमागे खालील डाव्या बाजूस तीव्र वेदना होत होत्या. दुखणे इतके जास्त होते की आठ-दहा मिनिटे चालणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते. व्यक्तीची एमआरआय चाचणी केली असता त्यामध्ये लंबर कॅनल स्टेनोसिस अर्थात नसांमध्ये अत्यंत कमी जागा झाल्याचे निदर्शनास आले. नियोजित पीजी कॉलेजसाठी नियुक्त केलेले प्राध्यापक डॉ. प्रवीण पाडळकर आणि सहा. प्राध्यापक डॉ. सुमित सोनवणे यांनी या रिपोर्टसची बारकाईने पाहणी करून काहीशी कठीण असलेली ही शस्त्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रूग्णालयामध्येच करण्याचे निश्चित केले. स्पाइनल नेस्थेसिया अंतर्गत लंबर डिकन्प्रेशनने ही शस्त्रक्रिया 1 तास 15 मिनीटांच्या कालावधीत त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण त्याच्या लक्षणांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रूग्णालयाच्या रूग्णालयात साधारणत: रू. 2 ते 2.5 लाख इतका खर्च आला असता. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयातील ही शस्त्रक्रिया अगदी विनामूल्य यशस्वीपणे पार पडलेली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai