एण्डोस्कोपिक उपचाराने वाचले चिमुकलीचे प्राण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2022
- 500
सहा वर्षीय मुलीवर फोर्टीस रुग्णालयात यशस्वी उपचार
नवी मुंबई : खेळता खेळता सहा वर्षीय चिमुकलीने गोटी सदृश्य वस्तू गिळली. घशात वेदना होत असल्याने आई-वडिलांनी ताबडतोब तिला वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. आपत्कालीन वैद्यकीय टीमने एक्स-रे व सीटी स्कॅन केल्यानंतर अन्ननलिकेच्या वरील भागामध्ये वस्तू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या चिमुकलीवर शस्त्रक्रिया न करता एण्डोस्कोपी करुन गिळलेली वस्तू बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
नवी मुंबईत राहणार्या अरायना या सहा वर्षीय मुलीने खेळताना गोटी सदृश्य वस्तू गिळल्याने तिला घशात त्रास होवू लागला. तिच्या आईवडिलांनी तिला रात्री 10.15 वाजता फोर्टिस रुग्णालयात आणले. या लहान रूग्णासाठी उपचार योजना ठरवण्याकरिता आपत्कालीन वैद्यकीय टीमने त्वरित एक्स-रे व सीटी स्कॅन काढले. रूग्णाच्या शरीरामध्ये अडकलेल्या वस्तूच्या प्रकाराबाबत माहित नसल्याने वेळ आणि उपचार योजना आखणे अत्यंत महत्त्वाचे होते. एण्डोस्कोपिक उपचाराच्या माध्यमातून वस्तू काढण्याचे मोठे आव्हान होते. ज्यामुळे रूग्णावर शस्त्रक्रिया करणे टाळता येऊ शकेल आणि रूग्णाच्या घशामध्ये अडकलेली वस्तू बाहेर काढण्यासाठी कोणतीही चीर करावी लागणार नाही असे सीनियर कन्सल्टण्ट जनरल सर्जरी डॉ. जिग्नेश गांधी यांनी सांगितले. स्कॅन केल्यानंतर अन्ननलिकेच्या वरील भागामध्ये वस्तू असल्याचे निदर्शनास आले. रूग्ण खूपच लहान असल्यामुळे किमान इन्वेशनसह वस्तू काढण्याचे व तिच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण न होण्याचे आव्हान होते. त्यामुळे त्वरित एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एण्डोस्कोपी करुन दोन मिनिटांमध्येच गिळलेली वस्तू बाहेर काढण्यात आली, ज्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. अरायना एका दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यापासून तिच्या शरीरामध्ये अडकलेली वस्तू काढण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला केवळ 20 मिनिटे लागली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai