पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ घेण्याचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 05, 2022
- 541
7 डिसेंबर 2022 पर्यत नोंदणी करावी
नवी मुंबई ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. कोविड काळात नुकसान झाल्याने शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करता यावा यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेकडून रु.10 हजार रक्कमेचे खेळते भांडवली कर्ज देण्यात येत आहे. 7 डिसेंबर 2022 पर्यत नोंदणी करुन या निधीचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पथविक्रेत्यांनी प्रथम टप्प्यात रु.10 हजार कर्ज रक्कमेची नियमित परतफेड केल्यास व्दितीय टप्प्यात रु.20 हजार भांडवली कर्ज देण्यात येते आणि रु 20 हजार कर्जाची नियमित परतफेड केल्यास तृतीय टप्प्यात रु.50 हजार इतके कर्ज देण्यात येते. अशाप्रकारे पथविक्रेत्याची बॅकेमध्ये पत वाढल्यास त्यास बँकेव्दारे अधिक पतपुरवठा करण्यात येतो. त्या सोबतच केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या भविष्य निधीवर आधारित हयात असेतोपर्यंत 08 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत झालेल्या उद्दिष्ट पूर्तीबाबत आढावा घेतला होता. माहे डिसेंबरमध्ये राज्यातील पथविक्रेत्यांना एकत्रित रु.10 हजार वितरण करण्याच्या दृष्टीने पुन:श्च कोविड परस्थितीमुळे अस्थिर झालेल्या पथविक्रेत्यांना व तत्सम व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांना विशेष पतपुरवठा करणेबाबत सूचना केल्या होत्या. त्यास अनुसरून राज्यातील सर्वच महानगरपालिका क्षेत्रात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेला 6839 एवढे उद्दिष्ट देण्यात आलेले असून 3055 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचेमार्फत याविषयी नियमित आढावा घेतला जात आहे. सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त व बँकेचे व्यवस्थापक यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार आठवडयातील सर्व दिवस (सार्वजनिक सुट्टीसह) सर्व विभाग कार्यालयांमध्ये पथविक्रेत्यांच्या नोंदणीची कार्यवाही सुरू आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पथविक्रेते व तत्सम व्यवसाय करणार्या सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या विभाग कार्यालयात जाऊन आपले आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र / फेरीवाला परवाना / गुमास्ता लायसन्स / शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे बँक पासबुक व आपला मोबाईल आधारकार्डशी लिंक करुन 7 डिसेंबर 2022 पर्यत नोंदणी करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai