उलवे नोडला मिळाली हक्काची स्मशानभूमी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 12, 2022
- 627
काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई ः उलवे नोडची स्थापना होवून अनेक वर्ष झाली मात्र हक्काची स्मशानभूमी नसल्याने येथील मृतांच्या अत्यंविधीसाठी नातेवाईकांना सीबीडी किंवा वाशी गाठावे लागत होते. नोडवासियांनी स्वतंत्र स्मशानभुमीची मागणी केल्यावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना पाठपुरावा करुन सेक्टर 14 येथे स्मशानभूमीसाठी 1.5 करोड निधी मंजूर करून घेतला व आता तिचे कामही पुर्णत्वास आले आहे. त्यामुळे उलवे नोडवासियांची मृत्यूनंतरची फरफड थांबणार आहे.
अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे, प्रकल्पग्रस्त गावकर्यांना विनंती करावी लागत असे. त्यातील अनेक गावांनी नोडवासियांना त्यांच्या स्मशानभूमीत मज्जाव केल्यामुळे, अंत्यविधीसाठी नातेवाईकांना सी.बी.डी. बेलापूर, खारघर, वाशी येथे जावे लागत असे. उलवे नोड मधील अनेक नागरिकांच्या फोरमने, महेंद्र घरत यांच्याकडे समस्याग्रस्त उलवे नोडच्या समस्या सोडविण्याची व स्वतंत्र स्मशानभुमी असावी अशी मागणी केली. महेंद्र घरत यांनी उलवे वासियांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरु केला. गेल्या 5 वर्षांच्या खडतर पाठपुराव्याने 1.5 करोड निधी मंजूर करून उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर 14 मध्ये उभी राहिली आहे. महिनाभरात या स्मशानभुमीचे काम पुर्ण होणार आहे. यामुळे उलवे नोड वासीयांची मृत्यूनंतर होत असलेली ससेहोलपट थांबणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai