नवी मुंबईकर वायरलने बेजार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2022
- 849
सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास
नवी मुंबई : वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडी, कधी उन्ह तर कधी ढगाळ वातावरणामुळे तब्येतीवर परिणाम होत आहे. सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीचा त्रास सुरु झाला आहे. आरोग्याच्या या वायरल समस्यांनी नवी मुंबईकर बेजार झाले आहेत.
यंदा शहरात डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा 2-3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात कमाल सरासरी तापमान 35 अंशांपर्यंत जाताना बघायला मिळते. सोबतच किमान तापमानात देखील घट होत असते. ख्रिसमसनंतर पुन्हा एकदा किमान तापमान घटण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता हिवाळ्यात तापमान 35 अंशांपर्यंत तापमान जात असल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला, शरीर दुखणे यांसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. याचा परिणाम लहान मुलांच्याही आरोग्यावर होतो. सध्या नवी मुंबईतील हवाही दुषित असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा 250 ते 300 एक्युआय हून अधिक निदर्शनास येत आहे एकंदरीत या अतिखराब हवेमुळे आजार बळावत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai