शिक्षण विभागातील 1081 पदनिर्मितीस मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2022
- 586
नवी मुंबई : पालिका शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्येत झालेली वाढ विचारात घेता तसेच मनुष्यबळाचा अभाव पाहता राज्याच्या नगरविवकास विभागाने नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागासाठी 1081 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे शिक्षण विभागातील ताण दूर होणार असून, विभागाच्या कामात सुसूत्रता येणार आहे.
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या एकूण 135 शाळा असून त्यामध्ये 58428 विद्यार्थी तर 1057 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय शहरात 450 खासगी शाळा असून त्यामध्ये 2,18,624 विद्यार्थी आणि 9624 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. खासगी शाळांच्या शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देखील महापालिका शिक्षण विभागावर आहे. यामुळे येथील कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. यामुळे शिक्षण विभागात वाढीव कर्मचारी, अधिकारी मिळावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी 20 जुलै 2022 रोजी शासनाकडे वाढीव पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास नगरविकास विभागाने 15 डिसेंबर 2022 रोजी मान्यता दिली. यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजात येणार सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळात सध्या नगरविकास विभागाने मंजूर केलेली 29 आणि शिक्षण विभागाने मंजूर केलेली 778 पदे आहेत. या पदांना यापूर्वीच समायोजित केलेले आहे. आता नव्याने 1081 पदनिर्मितीस नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने या विभागाने मंजूर केलेल्या पदांची संख्या 1110 होणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर 2017 च्या आकृतीबंधानुसार 3935 पदांसह आता मान्यता मिळालेल्या 1081 पदांसह एकूण 5016 पदांचा आकृतीबंध राहणार आहे.
या अतिरिक्त पदांच्या निर्मितीमुळे महापालिका तिजोरीवर वार्षिक 60.63 कोटींचा बोजा पडणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या 2021 च्या अहवालाप्रमाणे सातव्या आयोगानुसार महापालिकेचा आस्थापना खर्च 28.29 टक्के अर्थात 650 कोटी 63 लाख इतका आहे. आता शिक्षण विभागाच्या 1081 पदांच्या समावेशानंतर आस्थापना खर्चात 3.39 टक्के अर्थात 60.63 कोटींची वाढ होणार आहे. म्हणून आस्थापनेवर आता 31.58 टक्के इतका खर्च होणार असून शासन मर्यादा 35 टक्क्यांच्या आत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai