कोपरखैरणेत धर्मवीर क्रिकेट चषक स्पर्धांचा थरार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 24, 2022
- 611
23 ते 26 डिसेंबर ; घणसोली आणि कोपरखैरणे भागात 7 शिवसेना शाखांचे उद्धाटन
नवी मुंबई : धर्मवीर क्रिकेट चषकच्या निमित्ताने डान्सिंग अंपायर, स्थानिक बोली भाषेत समालोचन आणि लाखो रुपयांची बक्षिसाची बरसात असा अनुभव गेले 21 वर्ष नवी मुंबईकर घेत आहेत. यंदा हे बाविसावे वर्ष असून यावेळीही खास डान्सिंग अंपायर थेट पंढरपूरहून मागवण्यात आला आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते संजय राउत आणि माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस वितरण नंतर शिवसेनेच्या सात शाखांचे उद्धाटन केले जाणार आहे. अशी माहिती ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नवी मुंबईत गेल्या 21 वर्षापासून शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे हे धर्मवीर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरखैरणे येथे करतात. ठाणे शिवसेना अध्यक्ष आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ 2001 पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षात मिळणारा प्रतिसाद पाहता आता नवी मुंबई आणि नवीमुंबई बाहेरील अशा दोन गटात हे सामने होत असून प्रत्येकी आठ संघांचा समावेश या वर्षी आहे. कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानात हे सामने 23 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रथम पारितोषिक चषक आणि 2 लाख 2 हजार रुपये आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये असणार आहे.
या सामन्यांचे अनेक खास वैशिष्टे असून त्यात नृत्य करत निर्णय देणारे अंपायर हे एक विशेष आहे. महिलांना समालोचन करण्याची संधी जगात प्रथम याच सामन्यात देण्यात आल्याचा दावा आयोजक म्हात्रे यांनी केला आहे. यंदा या सामन्यांचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते संजय राउत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
- गेल्या अनेक वर्षापासून येमन येथे स्थायिक झालेले निलेश झुंजारराव हे खास या सामन्यात सामील होण्यासाठी भारतात अनेक वर्षापासून येतात. विविध देशात कामानिमित्त स्थायिक झालेले 7 पेक्षा अधिक खेळाडू यंदा सहभागी होणार आहेत.
- नवी मुंबईतील घणसोली आणि कोपरखैरणे भागात 7 शिवसेना शाखांचे उद्धाटन करण्यात येणार आहे. नवी मुंबईत शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने हे पाउल असल्याचे याच पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबई अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सांगितले.
- नवी मुंबईतील घणसोली आणि कोपरखैरणे भागात 7 शिवसेना शाखांचे उद्धाटनही या दरम्यान संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai