इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट्स सेंटरला पुरस्कार प्रदान
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2023
- 533
नवी मुंबई : नवी मुंबईच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट्स या सेंटरला रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय संम्मेलनात संपुर्ण भारतातील द्वितीय क्रमांकाचे उत्कृष्ट सेंटर हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सी.आर.राजू यांच्याहस्ते हा पुरस्कार नवी मुंबई इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कौशल जाडिया यांनी स्विकारला. या संमेलनात देशभरातील वास्तुविशारदांनी हजेरी लावली होती.
गृहनिर्माण व रिअल इस्टेट क्षेत्रात होत असलेल्या मुलभूत बदलांचा अवलंब करुन नवीन परिपुर्ण भारताच्या उभारणीत व विकासात वास्तुविशारदांचा सहभाग सुनिश्चित करणे हा इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्स या राष्ट्रीय संस्थेचा या कार्यक्रमा मागचा मूळ उद्देश होता. या कार्यक्रमात वास्तूकला क्षेत्रातील निमंत्रित दिग्गजांनी आपआपले अनुभव कथन करुन त्यांच्या उत्कृष्ट वास्तुनिर्मितीचे उपस्थितांसमोर सादकीरण केले. या संमेलनाची सांगता सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करुन करण्यात आली. यावेळी नवी मुंबई सेंटरला देण्यात आलेला द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार नवी मुंबईतील संस्थेच्या पदाधिकाऱयांनी स्विकारला. हा पुरस्कार आय.आय.ए. नवी मुंबई सेंटरच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai