13 राज्यांच्या संस्कृतीचा महामेळा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 20, 2023
- 593
नवी मुंबई : देशातील 13 राज्यांतील सांस्कृतिक दर्शन घडविणारा राष्ट्रीय महोत्सव नवी मुंबईत सुरू होणार आहे. यामध्ये संस्कृती, नृत्य, फॅशन, खाद्य, क्रीडा, कला, साहित्य आणि टॉक शो दाखवले जाणार आहेत. या नवी मुंबई फेस्टचा उद्घाटन सोहळा 21 जानेवारी रोजी बेलापूर येथे होणार आहे.
सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल येथे 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई फेस्ट 2023 होणार आहे. या महोत्सवात देशातील 29 राज्यांचा सहभार असणार आहे. ओडिशा, केरळ, कर्नाटक, गुजरात, यूपी, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश या राज्यांची संस्कृती, पर्यटन, नृत्य, खाद्यपदार्थांचे सादरीकरण केले जाणार आहे. या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर भेट देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे 13 राज्यांची संस्कृती अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
उद्घाटन सोहळा 21 जानेवारी रोजी होणार असून 22 जानेवारीला नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानात फुटबॉल स्पर्धा, 23 जानेवारीला सीबीडीतील राजीव गांधी मैदानात हॉकी स्पर्धा, 24 जानेवारीला कॅन्सर रुग्णांसाठी शिबीर, 25 जानेवारीला कॅन्सर रुग्णांना आहार वाटप, 26 जानेवारीरला रामलीला मैदानात पतंग महोत्सव. 27 ते 29 जानेवारी दरम्याने खाद्यपदार्थांचीही लज्जत सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे घेता येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai