पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिक्षामंत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2023
- 644
नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जानेवारी रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये परीक्षा पे चर्चा 2023 कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशभरातून या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी 38 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नवी मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
27 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील 38 लाख विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी आणि परीक्षेदरम्यानच्या वेळेचे व्यवस्थापन याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'परीक्षा पे चर्चा' ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील करोडो विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत. मला ही परीक्षा देताना आनंद होतो. कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असेल तर ते धोकादायक ठरते असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नवी मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक या मान्यवरांनी देखील पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी केलेला मनमोकळा, मार्गदर्शनपर संवाद पाहिला. देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी सखोल उत्तरे दिली.
कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”, असा संदेश मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये. केवळ परीक्षेसाठीच नव्हे तर जीवनातही वेळेच्या व्यवस्थापनाचे भान ठेवायला हवे, असे ते म्हणाले. वेळेवर कामे होत नसल्याने कामे रखडतात. काम करून कधीच थकायला होत नाही. काम करून समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai