मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2023
- 567
नवी मुंबई ः जवळचे वा इच्छा नाही म्हणून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील अनेक रिक्षा चालकांविरोधात तोंडी, लेखी अनेक तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने याची दखल घेत एका विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.
रिक्षा चालकांविषयी तसेच बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तक्रार आल्याने पाहणी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वाहतूक शाखेतील स्ट्रायकिंगवरील अंमलदार व सिवूड वाहतूक शाखा येथील अधिकारी व अमंलदार यांचे सह सिवूड वाहतूक शाखा हद्दीत कारवाई केली गेली.
रिक्षा चालक हे भाडे नाकारतात, उद्धट वर्तन करतात. मिटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. तसेच बाईक, कार, रिक्षा, व इतर वाहने यांची पार्किंग, होणारी वाहतूक कोंडी याबाबत लेखी व तोंडी तक्रारीमुळे सिवूड मॉलसमोरील रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या एकूण 144 वाहनांवर मो. वा. का. कलम 122 अन्वये 1 लाख 7 हजार इतक्या दंडाच्या रक्कमेची संयुक्तीक कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई चालकामध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली असून, यापुढेही वाहन धारकांनी आपली वाहने ही नियोजित केलेल्या पार्कीगमध्ये पार्क करावी. तसेच, कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai