दिवाळे गाव सौरऊर्जेने उजळणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2023
- 472
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत दिवाळे गावात अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यात आता सौरऊर्जा प्रकल्पाची भर पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने 10 कोटींचा निधी मंजूर केला असून याचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबईतील दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज अंतर्गत कामे सुरु आहेत. हे गाव खाडी किनारी असून मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यासाठी याच उपक्रम अंतर्गत यापूर्वी जेट्टी उभा करण्यात आली शिवाय रस्ते, दैनंदिन बाजार आदी कामे झाली आहेत. त्यात आता सौर ऊर्जेच्या पथदिव्यांची भर पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या 10 कोटीत दहा ठिकाणी हाय मास्क आणि खांबे बसवण्यात येणार आहेत. या हाय मास्कमुळे रात्रीही गाव उजळून निघणार आहे.
सध्या वीज उत्पादनात येणारा खर्च पाहता अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यातच या दिव्यांच्या मुळे विजेची मोठी बचत होणार आहे. दिवाळे गावातील सौर दिव्यांच्या (हाय मास्क) दहा कोटींची मंजुरी मिळाली असून तसेपत्रक काढण्यात आलेले आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर हि कामे पुढे सरकतील अस आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai