माजी नगरसेविकेचे उपोषण तात्पुरते स्थगित
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 14, 2023
- 493
विकास कामांमध्ये पक्षपातीपणाचा आरोप
नवी मुंबई : विकास कामांमध्ये पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप करत रविवारी माजी नगरसेविका अंजली वाळुंज व भाजपाचे पदाधिकारी विजय वाळुंज यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू केलेले साखळी उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले.
काही ठराविक विभागांमध्ये कोटींची कामे केली जातात परंतु प्रभाग कमांक 62 मध्ये अत्यावश्यक कामे सुद्धा प्रशासनाकडून केली जात नसल्याचा गंभीर आरोप करत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवारी सकाळी माजी नगरसेविका अंजली वाळुंज व समाजसेवक विजय वाळुंज यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. याप्रकरणी माजी खासदार संजीव नाईक यांच्या मध्यस्थी नंतर महापालिका प्रशासनाने काही कामे तत्काळ मान्य केली व काही मागण्यांसाठी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे विजय वाळुंज यांनी सांगितले. त्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित केले असून इतर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा वाळुंज दाम्पत्यांनी दिला आहे.
यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक तसेच माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, माजी नगरसेवक संपत शेवाळे यांनी उपोषणाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai