सयाजीराव हे युगद्रष्टे महाराजा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 15, 2023
- 375
साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितली सयाजीरावांची महती
नवी मुंबई ः ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात संपन्न झालेल्या या व्याख्यानामध्ये त्यांनी सयाजीरावांच्या महनीय कार्याचा आढावा घेत सयाजीराव आणि बाबासाहेब या दोन युगपुरूषांच्या परस्पर जिव्हाळ्याच्या आणि आदराच्या संबंधांविषयी विविध ऐतिहासिक दाखले देत प्रकाशझोत टाकला. त्यांच्याइतका द्रष्टा आणि काळाच्या पुढचा विचार करणारा पुरोगामी राजा अलौकिक आहे अशा शब्दात बाबा भांड यांनी महाराजा सयाजीरावांच्या कार्याची महती अनेक उदाहरणे देत सांगितली.
‘महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर साहित्यिक, विचारवंत बाबा भांड यांचे महाराजा सयाजीरावांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ‘विचारवेध' या शृंखलेंतर्गत पालिकेमार्फत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात संपन्न झालेल्या या व्याख्यानामध्ये त्यांनी सयाजीरावांच्या महनीय कार्याचा आढावा घेत सयाजीराव आणि बाबासाहेब या दोन युगपुरूषांच्या परस्पर जिव्हाळ्याच्या आणि आदराच्या संबंधांविषयी विविध ऐतिहासिक दाखले देत प्रकाशझोत टाकला. बाबासाहेबांमधील हुशारी, उज्ज्वल भविष्य सयाजीरावांना आधीच ओळखले होते, त्यामुळे बाबासाहेबांच्या उच्चशिक्षणासाठी सयाजीरावांनी संस्थानाच्या शिष्यवृत्तीबाबतच्या नियम पालनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिप्राय नस्तीवर असतानाही शिष्यवृत्ती मर्यादेचे नियम ओलांडून बाबासाहेबांना 4 वेळा शिष्यवृत्ती प्रदान केली. सयाजीरावांनी आपल्या हयातीत त्याकाळी 89 कोटी रक्कमेच्या शिष्यवृत्त्या प्रदान केल्या व अनेकांची भविष्ये घडविली असाही दाखला त्यांनी दिला.
शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे हे जाणणाऱ्या सयाजीरावांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यातही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. समाजविकासाच्या अनेक बाबींना प्राधान्य दिले. त्यांच्याइतका द्रष्टा आणि काळाच्या पुढचा विचार करणारा पुरोगामी राजा अलौकिक आहे अशा शब्दात बाबा भांड यांनी महाराजा सयाजीरावांच्या कार्याची महती अनेक उदाहरणे देत सांगितली. आपल्या देशाप्रती अत्यंत निष्ठा आणि अभिमान असणाऱ्या या राजाने ब्रिटिश सत्तेविरूध्द कधी मान झुकवली नाही असे सांगताना नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना या पुरोगामी विचारांच्या राजाची व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची साधी आठवणही कुणी काढली नाही याची खंत बाबा भांड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीने प्रकाशित केलेल्या सयाजीरावांच्या चरित्राचे 62 खंड स्मारकातील ग्रंथालयास प्रदान केले.
जगातील 85 देश फिरल्यानंतर आणि दोनशेहून अधिक जागतिक वारसा स्थळे पाहिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाहिले आणि हे स्मारक त्या तोडीचे असल्याचे जाणवले असे अभिप्राय व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव तथा सुप्रसिध्द साहित्यिक बाबा भांड यांनी या स्मारकातून बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना दिलेले महत्व पाहता याठिकाणी वारंवार भेटी द्यायला आवडेल असे मत व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai