एमआयडीसी विरोधात प्रकल्पग्रस्त एकवटले
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2023
- 537
नवी मुंबई : अनेक वर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित असून पुनर्वसन धोरणही रखडल्याने प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करुन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रादेशिक अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी दिले आहे.
1960 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाल्यावर पहिली आद्योगिक वसाहत ठाणे बेलापूर दरम्यान करण्यात आली. मात्र आजही ज्यांच्या जमिनीवर त्यांच्या वरील अन्याय अद्याप दूर झालेला नाही. त्यांच्या वर्षानुवर्ष रखडलेल्या मागण्यांसाठी गुरुवारी 29 गाव संघर्ष समिती, नवी मुंबईच्या नेतृत्वाखाली एम.आय.डी.सी प्रकल्प बाधीत भुमिपुत्रांनी लाक्षणिक आंदोलन केले. एमआयडीसी प्रकल्पग्रस्ताना 15 टक्के प्रमाणे विकसीत भुखंड द्यावा, प्रकल्पग्रस्ताच्या वारसांना नोकऱ्या आणि व्यवसायामध्ये आरक्षण त्वरीत देण्यात यावे, एमआयडीसी क्षेत्रातील बांधकाम, नुतनीकरण अशी दुरुस्ती कामे केवळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनाच देण्यात यावी, भूखंडावरील दरात आकारण्यात येणारे व्याज कमी करावे, मालमत्ता कर कमर्शिअल प्रमाणे आकारणी रद करावी, आदी मागण्या महापे एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai