10 एप्रिलपासून 24 तास पाणीपुरवठा बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2023
- 579
नवी मुंबई ः महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची व इतर कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे 10 एप्रिलपासून 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोमवार 10 एप्रिल रोजी, सकाळी 10.00 ते दुसऱ्या दिवशी मंगळवार, 11 एप्रिल रोजी, सकाळी 10.00 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 10 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळचा आणि 11 एप्रिल 2023 रोजी सकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच 11 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने सुरू होईल.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडमधील या कालावधीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai