दारावेत पायाभुत सेवासुविधांची वानवा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2023
- 258
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्मशानभूमीबाहेर ग्रामसभा
नवी मुंबई : भूमिपुत्रांच्या जमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे. असे असताना ग्रामस्थांच्या भविष्यातील गरजांचा विचार केला नसल्याचे सिडकोने केलेल्या नियोजनातून दिसत आहे. पायाभुत सेवासुविधांकडे सिडको व पालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्मशानभूमीबाहेर ग्रामसभा घेण्याची वेळ दारावेतील नागरिकांवर आली आहे.
दारावे गावामध्ये कुठल्याच प्रकारच्या कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तसेच खेळण्यासाठी मैदान नसल्याने नागरिकांची उपेक्षा होत आहे. त्यामुळे कवडीमोल भावात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेणाऱ्या सिडकोविरोधात संतापाची भावना आहे. दारावे ग्रामस्थांनी वांरवार सिडकोकडे पायाभूत सुविधांबाबत अर्ज-विनंत्या केल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्षच झाले असल्याने ग्रामस्थांना सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर काही कार्यक्रमांसाठी भाड्याच्या जागेचा वापर करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे' आहेत. त्यामुळे सिडको तसेच मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील स्मशानभूमीत ग्रामसभा घेतली आहे.
- पालिकेवर मोर्चा काढणार
दारावे गावातील ग्रामदेवतेच्या जागेवर प्रस्तावित समाज मंदिरासाठी भूखंड राखीव असताना भूमाफियांकडून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. याविरोधात ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या दिवसांत ग्रामस्थांच्या मागणीसाठी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai