परफॉर्मन्स केमिसर्वे कंपनीला स्थानिकांचा विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2023
- 360
कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करण्याची मागणी
उरण ः तळोजा एम आय डी. सी येथील परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्या अनुषंगाने सदर कंपनीचे सर्व परवानगी रद्द करावे अशी मागणी मनसेने रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मे.परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड ही कंपनी ज्या जागेत उभारण्यात येत आहे ती जागा ग्रीन झोन होती आणि या जागेत नियमांचे उल्लंघन करून केमिकल झोन करण्यात आले आहे. ग्रीन झोन मधुन केमिकल झोन रुपांतरीत करत असताना तळोजा एम.आय.डी.सी व प्रदूषण नियंत्रण खात्याचे कायद्याचा उल्लंघन करून केमिकल झोन या व्यवस्थापनाने प्राप्त केला आहे. 90 मीटरच्या आत स्थानिक गाव वसाहत आहे. त्यामुळे परिसरातील 10 हजार लोकांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा या कंपनीला विरोध आहे. या सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर कंपनीला दिलेल्या सर्व परवानग्या त्वरित रद्द कराव्यात. शासनाने योग्य ती त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास एम.आय.डी.सी तळोजा व प्रदूषण नियंत्रण एमपीसिबी कार्यालयावर मनसे तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.
यावेळी पनवेल मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील,उपतालुका अध्यक्ष पनवेल चिंतामणी मुंगाजी, उपतालुका अध्यक्ष पनवेल संजय तन्ना,रस्ते आस्थापना जिल्हा संघटक रमेश पाटील, उपजिल्हा रस्ते विजय ठाकूर, भातान शाखाध्यक्ष सोनी बेबी,कार्यकर्ते कैलास माळी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai