सीबीएसई शाळांची लॉटरी 4 मे ला
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2023
- 300
नवी मुंबई ः महापालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई मंडळाची शाळा सुरू केली आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. यंदा 240 जागांसाठी 959 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू झाली नसून लॉटरीकडे सर्व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी 4 मे रोजी ही लॉटरी काढण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर 11 व नेरूळ सेक्टर 50 याठिकाणी पालिकेची सीबीएसई मंडळाची शाळा उभारली आहे. खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे शिक्षण आपल्या मुलांना देणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना करीता सीबीएसई शाळा सुरू करून पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या शाळांना प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी प्रवेश घेण्यासाठी 25मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दोन्ही शाळांत 1,115 अर्ज दाखल झाले आहेत. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 मध्ये 673 अर्ज दाखल झाले असून 521 पात्र ठरले आहेत तर सीवूडस शाळा क्रमांक 93 मध्ये 442 अर्ज प्राप्त झाले असून 414 अर्ज पात्र ठरले असून यापैकी 240 जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये वयोगटात न बसल्याने आणि शाळे जवळच्या परिघाचा विचार करता उर्वरित अर्ज बाद झाले आहेत. अखेर 4 मे ला ही लॉटरी काढण्यात येणार असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai