वाहतूक पोलिसांची कारवाई मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2023
- 408
महिनाभरात 62 हजार वाहनांवर कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून एप्रिल महिन्यात तब्बल 62 हजार 599 एवढ्या कारवाई केल्या आहेत. त्यातील 1 हजार 989 प्रकरणे लोकअदालतमध्ये निकाली लागले असून त्यातून 9 लाख 90 हजार 950 दंड वसुली झाली आहे.
शहरात बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. केवळ एप्रिल महिन्यात 62 हजार 599 एवढ्या कारवाई केल्या आहेत. ज्यात अतिवेगाने वाहन व चालविणे सिटबेल्ट 6 हजार 843, विना हेल्मेट 7 हजार 897, सिग्नल तोडणे 128, मद्य प्राशन करून वाहन चालविणे 12 हजार 466, विना हेल्मेट 1हजार 898, धोकादायक वाहन चालविणे 91, गाडी चालवताना मोबाईल संभाषण एक हजार 21 अशा महत्त्वाच्या वाहतूक नियम भंग कारवाई केल्या आहेत तर बाकी अन्य कारवाई आहेत. या कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 16 वाहतुक शाखांकडून एप्रिल 2023 मध्ये मोटर वाहन कायदा कलमान्वये करण्यात आल्या आहेत.
30 एप्रिल रोजी पार पडलेल्या लोक अदालत मध्ये एकूण 1989 इतक्या केसेस निकाली काढण्यात आलेल्या असून 9 लाख 90 हजार 950 एवढा दंड वसुल केला आहे. याबाबत वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की “घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे” एवढेच लक्षात ठेवून गाडी चालवत जा असे आवाहन आम्ही करीत आहोत. यापुढेही वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर वेळोवेळी वाहतुक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे व वाहतुक सुरळीत ठेवण्यात नवी मुंबई वाहतुक विभागास सहकार्य करावे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai