स्वच्छोत्सव विन्स पुरस्काराने महिला व संस्थाचा गौरव
- by Aajchi Navi Mumbai
- May 18, 2023
- 307
नवी मुंबई ः स्वच्छता कार्यात महिला सहभाग आणि नेतृत्व या अनुषंगाने विंन्स ॲवॉर्डसाठी मागविलेल्या प्रवेशिकांमध्ये देशात सर्वाधिक 616 महिला व महिला संस्थांनी प्रवेशिका दाखल केल्या. यामधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 5 महिला संस्थांना विविध कॅटेगरीमध्ये आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये ‘महिला नवउद्योजक आणि चेंज एजन्ट' या कॅटेगरीत ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या प्रमुख रिचा समीत यांस ‘विन्स ॲवॉर्ड‘ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
‘अशासकीय संस्था' कॅटेगरीत ‘शेल्टर असोसिएट्स' तसेच ‘लघु उद्योजक' कॅटेगरीत फुलांच्या पाकळ्यांपासून अगरबत्ती बनविणाऱ्या ‘समता महिला मंडळ' यांचा ‘विन्स ॲवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला. ‘महिला बचत गट' या कॅटेगरीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल प्रभावीपणे राबविणाऱ्या ‘सिध्दी बचत गट' यांचा तसेच ‘स्टार्टअप अंतर्गत नवउद्योजक' या कॅटेगरीत कापडी पिशव्या निर्मितीत पुढाकार घेऊन प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई महिला विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था' यांना सन्मानीत करण्यात आले.
नवी मुंबईच्या स्वच्छताविषयक यशस्वी कामगिरीत सफाई कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमाणेच लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला, स्वच्छताप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यापुढील काळातही समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने अधिक उत्तम कामगिरी करून देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा प्राप्त करूया असा विश्वास आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai