रविवारी पल्स पोलिओ लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2023
- 453
नवी मुंबई ः शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार, 28 मे रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ करण्यात येणार असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.
भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटामधील अपेक्षित 90897 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य नजरेसमोर ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 604 स्थायी बूथ, 94 ट्रान्झिट बूथ आणि 28 फिरते (मोबाईल) बूथ असे एकूण 726 बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रान्झिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मोहीमेच्या सुनियोजित आयोजनाच्या दृष्टीने महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे रितसर प्रशिक्षणही घेण्यात आलेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai