दुचाकी चालकांना हेल्मेटची सक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 01, 2023
- 276
नवी मुंबई : दुचाकीस्वारासह त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, असे असताना शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये चालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन अधिनियम 194 (क) नुसार नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
वाहन अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांचे झाले आहेत. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 128 नुसार दुचाकीस्वार तसेच त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्याला हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, हेल्मेटसक्तीचे आदेश असताना आजही अनेक जण विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दुचाकीधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून नवी मुंबईतील सर्व शासकीय, खासगी कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी-अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच संस्थेच्या परिसरात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यास मज्जाव करण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
- विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेशबंदी
नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 194 (क) अंतर्गत संस्थेला जबाबदार धरून संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शासकीय तसेच खासगी कार्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांना परिसरात प्रवेशबंदी केली आहे.
नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेशबंदी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. - हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai