पावसाळ्यात नागरिकांसाठी दक्ष राहण्याचे आयुक्तांचे निर्देश
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2023
- 424
नवी मुंबई ः पावसाळा सुरु झाला असून या कालावधीत पालिकेच्या आपत्कालीन विभागासह सर्वच विभागांनी दक्ष राहून आपापली जबाबदारी पार पाडावी व पालिका क्षेत्रातील पोलीस, वाहतुक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणांशी कायम संवादी राहून परस्परांशी समन्वय राखत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने दिलेले आहेत.
13 जून रोजी संध्याकाळपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर आयुक्त नार्वेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना अधिक प्रमाणात पडणारा पहिलाच पाऊस असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पावसाच्या पाण्याचा योग्य रितीने निचरा होत असल्याबाबत खात्री करून घेण्याचे विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित करण्यात आले. यापुढील काळात आठही विभाग कार्यालयातील तसेच 5 अग्निशमन केंद्रांमधील आपत्ती नियंत्रण कक्ष अधिक दक्षतेने कार्यरत राहतील याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभागनिहाय नेमलेले नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे कायम दक्ष राहणे अत्यंत गरजेचे असून परिस्थितीनुसार मदतकार्याची सज्जता ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
13 जून रोजी सकाळी 8.30 ते 14 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत नमुंमपा क्षेत्रात सरासरी 24.11 मि.मि. पावसाची नोंद झालेली असून यामध्ये बेलापूर विभागात 16.60 मि.मि., नेरुळ विभागात 23.40 मि.मि., वाशी विभागात 14.40 मि.मि., कोपरखैरणे विभागात 22.70 मि.मि., ऐरोली विभागात 33.60 मि.मि., दिघा विभागात 34 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. मोरबे धरण परिसरातही 6.40 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली असून मोरबे धरणाची पातळी 69.39 मीटर इतकी झालेली आहे.
- मोबाईल बंद राहणार नाही याची दक्षता घ्या
विभागप्रमुखांसह सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन सुरु राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच विशेषत्वाने रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत फोन बंद राहणार नाहीत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. याबाबत कोणत्याही सबबी चालणार नाहीत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. अडचणीच्या प्रसंगी मदतकार्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai