सुट्टी संपली शाळा भरली...
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 16, 2023
- 542
सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; कुठे हसू तर कुठे रडू
नवी मुंबई ः 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी 15 जूनपासून शहरातील शाळा सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कुठे पुष्पवृष्टी, कुठे खाऊ वाटप, तर कुठे पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. काहींना उन्हाळी सुट्टीनंतर मित्र पुन्हा भेटले म्हणून आनंद झाला तर काहींना आईपासून दूरावणार म्हणून रडू आले. त्यामुळे पालकांनाही विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसावे लागले. सर्व शाळांमध्ये पहिला दिवस असल्याने किलबिलाट पाहायला मिळाला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेल्या शाळांमध्ये गुरुवारपासून पुन्हा किलबिलाट सुरू झाला आहे. नवे शैक्षणिक वर्ष, नवा गणवेश, नवीन पुस्तके, नवा अभ्यासक्रम, नवे वर्गशिक्षक, नवीन वह्या, वेळापत्रक अशा विविध बाबी जाणून घेण्यासाठी विद्यार्थी वर्ग उत्सुक असल्याचे दिसत होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे, यासाठी शाळा परिसर स्वच्छ करणे, रांगोळी, फुलापानांची तोरणे, पताका बांधून वर्ग खोल्या सुशोभित केल्या होत्या. काही शाळेत विद्यार्थ्यांच्या फोटोसेशनसाठी डेकोरेशन केल्याचे पाहायला मिळाले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. तसेच काही शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai