लसणानेही खाल्ला भाव
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 05, 2023
- 291
दरात 10-15 रुपयांनी वाढ
नवी मुंबई : एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत अससल्याने दर वधारत आहेत. दिवसेंदिवस दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो उटी लसूण 130-160 रुपये व देशी लसूण 115-125 रुपये आणि किरकोळ बाजारात 180-200 रुपयांवर पोहचला आहे.
जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला लसणाचे दर आवाक्यात होते. परंतु एप्रिलपासून आवक कमी झाल्याने भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसूण 50 तर 80 रुपये इतके होते. मात्र एप्रिल महिन्यापासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारातच लसूण दिडशेरुपयांवर गेले असून, उटी लसूण 130-160 रुपये व देशी लसूण 115-125 रुपयांनी विक्री होत आहे, तर किरकोळ दर 200 रुपयांवर गेला आहे.
घाऊक बाजारात मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,आणि गुजरात मधून लसणाची आवक होत असते. बाजारात हंगामात सरासरी 15 ते 20 गाड्या लसणाची आवक होते. मात्र मंगळवारी बाजारात अवघ्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. 1 हजार 219 क्विंटल लसूण आवक झाली आहे.
पावसामुळे लसूण उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी होत आहे. दोन वर्षांपूर्वी 200 ते 250 रुपयांनी लसूण विकला जात होता. पुन्हा यंदा तीच परिस्थिती ओढावली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये लसूण 40-80 रुपयांना उपलब्ध होते. पुढील कालावधीत दर आणखीन कडाडण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai