नैना बिल्डर असोशिएशनतर्फे नवीन योजनेचे सादरीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 284
नवी मुंबई ः नैनामधील विकासाआड येणाऱ्या मूळ समस्या जाणून घ्ोण्याकरिता सिडकोचे नवनियुक्त सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्याकडे नैना बिल्डर असोशिएशनतर्फे नवीन योजनेचे सादरीकरण करण्यात आले. नैना क्षेत्रातील संपूर्ण गांवठाणाच्या 500 मीटर क्षेत्रात रिजनल प्लॉनप्रमाणे विकासाला परवानगी देण्यासह असोशिएशनतर्फे अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध कामाकरिता अधिकारी आणि सल्लागार यांची नेमणूक करुन पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी नैना बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
नैना बिल्डर असोशिएशनच्या वतीने शासनाने विकास आराखड्याकरिता मंजुरी दिलेल्या 175 गावातील समस्या दोन विभागात सादर करण्यात आल्या. 23 गावातील सिडकोचे पायलट प्रोजेक्ट म्हणून टीपी स्कीम राबविण्यात येत आहे. या संपूर्ण ठिकाणी 12 टीपी स्कीमचे सादरीकरण शासनाला केले असल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात आले. परंतु, गांवठाणांच्या 200 मीटर क्षेत्राचा विकाससुध्दा थांबविण्यात आल्याची खंत असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. गांवठाण क्षेत्राच्या 200 मीटर क्षेत्रात पूर्वीपासून चटई क्षेत्र एक अनुज्ञेय आहे. त्या क्षेत्रास टीपी स्कीममध्ये न घेता विकास होऊ देण्यास अनुमती असावी. तसेच विकास आराखडयात पूर्वी मंजूर असलेल्या झोन नुसार कमीतकमी 40 टक्के क्षेत्रास तरी परवानगी सुरु असावी, अशी मागणी असोसिएशनर्फे सिडकोकडे करण्यात आली. 23 गावांव्यतिरिक्त 152 गावांच्या क्षेत्रामध्ये विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार तेथील रस्ते, गार्डन, हॉस्पीटल, आदि विविध सोयी-सुविधांकरिता असलेल्या आरक्षणाचे भूसंपादन आणि विकासाची जबाबदारी एमआरटीपीच्या सेक्शन 42 अन्वये पार पाडावी. तसेच टीडीआर समाविष्ट करण्याबाबत महत्व निर्माण करावे. जेणेकरुन एलडीझेड झोनमध्ये विकासाला वाव मिळू शकेल आणि या क्षेत्रात 0.2 चटई क्षेत्राऐवजी युडीसीपीआर प्रमाणे रस्त्याच्या रुंदीनुसार सामाविष्ट करण्यासाठी मूभा असावी. नैना क्षेत्रातील संपूर्ण गांवठाणाच्या 500 मीटर क्षेत्रात रिजनल प्लॉनप्रमाणे मुभा दिल्यास गांवठाणात सोयीसुविधा उपलब्ध असल्याने विकासाला चालना मिळेल. त्यामुळे टीडीआर सामाविष्ट केल्याने त्याला किंमत मिळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण होईल. यासाठीच नैना क्षेत्रात 500 मीटरपर्यंत विकासाला संमती असावी. टीडीआर उपलब्ध असल्याबाबत जमीन मालकासह संपूर्ण माहिती नैनाच्या पोर्टलवर खरेदीदारांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही असोसिएशनतर्फे करण्यात आली. तसेच वन क्षेत्राच्या जमिनी, सरकारी जमिनी यांना हस्तांतर करण्याची कार्यवाही करणेसाठी विशेष अधिकारी किंवा सल्लागाराची नियुक्ती करावी, अशी मागणीही यावेळी सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली.
दुसरीकडे शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी मोठयाप्रमाणात पाठपुरावा करावा लागतो. सद्यस्थितीत सिडकाने मंजुरीसाठी पाठवलेले इपीचे प्रस्ताव, युडीसीपीआरचा प्रस्ताव, टीडीआर, आयसीसी चार्जेसे, टीपी स्कीम, आदि विविध प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. याचा पाठपुरावा करण्याकरिता डीओ लेटर तयार करुन मुख्य भूमापन अधिकारी पाठपुरावा करतील. तसेच विविध कामाकरिता अधिकारी आणि सल्लागार यांची नेमणूक करुन पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी नैना बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी सिडकोचे विशेष कार्य अधिकारी वेणूगोपाल, मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर, वरिष्ठ नियोजनकार अनुपमा कन्नन, सहनियोजनकार प्रांजली माने, मुख्य भूमी-भूमापन अधिकारी समाधान खटकाळे, आदि उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai