नवी मुंबईकरांची चिंता मिटली
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 28, 2023
- 502
मोरबे लवकरच ओव्हर फ्लो होणार
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणाच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये 85 मीटर पाणी पातळी असून अशीच पावसाने कृपा केल्यास धरण लवकरच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘आजची नवी मुंबई' शी बोलाताना व्यक्त केली.
पाऊस लांबल्याने मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. परिणामी पालिकेने नोडनुसार पाणीकपात सुरु केली होती. धरणात 33 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबईकरांचे पावसाकडे लक्ष लागले होते. 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. सतत पडणाऱ्या पावसाने राज्यभरातील धरणे, तलाव भरली आहेत. त्याप्रमाणे नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरणाची पाणीपातळीही वाढली आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागांत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई आणि परिसरासाठी दिवसाला 470 एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. 2017 ते 2019 अशी सलग तीन वर्ष पूर्ण क्षमतेने भरणारे हे धरण पावसाळ्यात 2020 मध्ये मात्र पूर्ण भरले नव्हते. पुन्हा 2021- 2022 मध्ये धरण भरले. यंदाही धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे आहेत.
मोरबे धरणात 30 दिवसात 2545 मिमी पावसाची नोंद झाली असून पुढील जुनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात झाला आहे. 88 मीटर पाणीपातळी असणाऱ्या धरणात सध्या 85 मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे. असाच पाऊस पडला तर लवकरच धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
पाण्याची पातळी
- धरणाची क्षमता 88 मीटर
- सध्याची पातळी 85.07 मीटर
- धरणक्षेत्रातील पावसाचे एकूण प्रमाण 2545.20 मि.मि.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai