यंदाही ‘घरोघरी तिरंगा'
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 11, 2023
- 322
13 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन
नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाची सांगता 30 सप्टेंबर 2023 रोजी होत असून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
कोणत्याही उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमातही उत्साहाने सहभागी होऊन आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवून देशाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान व्यक्त करावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कालावधीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घरावर नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे तिरंगा फडकविला जाणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने नागरिकांनी मागील वर्षी फडकविलेला व घरात जपून ठेवलेला तिरंगा यावर्षी फडकवावा. जर मागील वर्षीचा तिरंगा ध्वज उपलब्ध नसल्यास राष्ट्रध्वजाची उपलब्धता नागरिकांना सहजपणे व्हावी याकरिता केंद्र सरकारमार्फत प्रत्येक पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन नागरिक ध्वज खरेदी करु शकतात. पालिकेच्या आठही विभाग कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देणारी सुविधा केंद्रे सुरु केली असून नागरिकांना सवलतीच्या दरात काठीसह केवळ रु. 15(रुपये पंधरा) मात्र या दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. भारतीय ध्वजसहिता 2002 मधील नियम 1.2 नुसार भारतातील नागरिकांना राष्ट्रीय सणानिमित्त त्यांच्या घरांवर, कार्यालये, कारखाने, शालेय इमारती अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र ध्वज फडकविताना व त्यानंतरही भारतीय ध्वजसंहितेतील नियमांचे पालन करणे गरजेचे असून याबाबत महानगरपालिका स्तरावरुन नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.
आपल्या देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर व सन्मान अभिव्यक्त करण्यासाठी ‘घरो घरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा' हा उपक्रम ही एक चांगली संधी असून यामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने सक्रीय सहभागी होऊन आपल्या मनात असलेली देशभक्ती मूर्त स्वरुपात प्रकट करण्याच्या दृष्टीने आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत तिरंगा फडकवावा आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी तो सन्मानपूर्वक उतरवून जतन करून ठेवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai