स्वच्छ सर्वेक्षणाच्या संकल्पनांसाठी पालिकेत सूचनापेटी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 21, 2023
- 356
नवी मुंबई ः शहराची स्वच्छता ही ओळख बनलेली असून हा स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाच्या बळावर नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. या अनुषंगाने स्वातंत्र्यदिनी ‘स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हव्दारे थेट संवाद साधताना आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वैचारिक लोकसहभाग घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला. त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने ‘निश्चय केला, नंबर पहिला‘ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या कल्पना, नवे विचार पुढे यावेत यासाठी महापालिका मुख्यालयात प्रवेशव्दारासमोर दर्शनी भागी सूचनापेटी ठेवण्यात आलेली आहे.
महापालिका अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानाच्या आसपासच्या इमारती व भागातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेऊन त्यामधील त्रूटी दूर करण्यासाठी जागरूकतेने काम करावे व ‘स्वच्छतेसाठी योगदान देणारा कर्मचारी' बनावे, अशी संकल्पना आयुक्तांनी मांडली व त्याव्दारे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाचा शहर स्वच्छता कार्यात आणखी प्रभावी रितीने सक्रिय योगदान घेण्याचा नवा संकल्प मांडण्यात आला. यादृष्टीने महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत सूचनापेटी ठेवण्यात आली आहे. या सूचनापेटीच्या संकल्पनेबद्दल माहिती देताना आपल्या मनोगतात आयुक्तांनी स्पष्ट भूमिका मांडली. स्वच्छतेविषयी वेगळ्या दृष्टीने विचार होऊन काही नव्या संकल्पना पुढे येणे गरजेचे वाटते. अशा नाविन्यपूर्ण सूचना, संकल्पना की ज्यांचा शहर स्वच्छता कार्यात प्रत्यक्ष लाभ होईल. त्यादृष्टीने स्वच्छतेविषयी काही नव्या संकल्पना महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना किंवा जागरूक नागरिकांना मांडायच्या असतील तर त्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सूचनापेटीची संकल्पना साकारण्यात आली आहे. हर स्वच्छतेतील अपेक्षित सुधारणांबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांनी आपल्या मौल्यवान संकल्पना, सूचना 30 ऑगस्ट 2023 पर्यंत कागदावर लिहून अथवा टंकलिखित करून स्वच्छ सर्वेक्षणाकरिता महापालिका मुख्यालयात दर्शनी भागी ठेवलेल्या विशेष सूचनापेटीत टाकाव्यात असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. या सूचनांमधील प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यायोग्य सूचना देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना विशेष प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानीत केले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai