सीट बेल्ट न लावणाऱ्या 905 जणांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2023
- 390
नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष उपक्रमाद्वारे कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे. चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणाऱ्या तब्बल 905 जणांवर कारवाई करण्यात आली.
रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर वाहतूक पोलीस विभाग भर देत आहे. यासाठीनवी मुंबई पोलिस आयुक्तालय परिसरात विशेष मोहीम राबवली जात असून शुक्रवारी सीट बेल्ट मोहीम राबविण्यात आली. दुपारी 12 ते 2 या केवळ दोन तास ही विशेष मोहिम राबविली. चारचाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो. सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 16 वाहतूक शाखांमधील कर्मचाऱ्यांनी एकूण 905 वाहन चालकांवर निर्णायक कारवाई केली. वाहतूक नियम हे सुरक्षेसाठीच असतात, त्यांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai