एनएमएमटी बसचे आग सत्र सुरुच
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2023
- 387
नवी मुंबई ः प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एनएमएमटीकडून विविध सेवा पुरविल्या जात असून नवीन बसही टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होत आहेत. मात्र हे सर्व असतानाही प्रवाशांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी खारघरमध्ये एनएमएमटीच्या बसला आग लागली होती. हे आग सत्र सुरुच असून पुन्हा एकदा घणसोली येथे नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागून बसची अर्धी जळून खाख झाली. या वाढच्या आग सत्रामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु असणाऱ्या परिवहन उपक्रमांकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी अनेक सवलती व सोयी सुविधा दिल्या जातात. तसेच नवीन विद्युत व एसी बस टप्प्याटप्प्याने परिवहनच्या ताफ्यात दाखल होत आहेत. मात्र यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी खारघरमध्ये चालु बसला अचानक आग लागल्याची घटटना घडली होती. परंतु सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्याची पुनरावृत्ती सोमवारी घणसोली येथे झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत नव्या कोऱ्या बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे वरुन चकाचक दिसणाऱ्या बसचा असा जिवघेणा बिघाड चिंताजनक ठरत आहे.
घणसोली आगारातून सोमवारी सायंकाळी घणसोली ते मुलुंड ही मार्ग क्रमांक 144 ही बस निघाली. मात्र बस मध्ये बिघाड झाल्याने एन एम एम टी प्रशासनाने दुसऱ्या बसची सोय केली. दुसऱ्या बस मधून प्रवासी मार्गस्थ झाल्यावर सदर बस मधील तांत्रिक बिघाड तात्पुरता दुरुस्त करण्यात आला. बस पुन्हा घणसोली डेपो कडे मार्गक्रमण करत असताना ऐरोली रबाळे अंतर्गत रस्त्यावर सेंट झेव्हीयर्स शाळे नजीक बस मधून अचानक धूर येणे सुरू झाले. त्यावेळी बस रिकामी व केवळ वाहन चालक असल्याने त्यांनी रस्त्याकडेला बस उभी करुन बाहेर उडी मारली. या नंतर काही क्षणात बसने आग पकडली व काही क्षणांत अर्धी बस जळून राख झाली. याबाबत चौकशीचे आदेश दिले जातील अशी माहिती एन एम एम टी व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली.
बस नवीन असताना असा प्रकार होणे धक्कादायक आहे. असा प्रकार यापूर्वीही झाला होता. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र यामुळे बस घेण्यापूर्वी नेमकी काय तपासणी करून बस ताफ्यात घेतात हे गौडबंगाल उकलणे गरजेचे आहे. - एन एम एम टी समितीचे माजी सदस्य समीर बागवान
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai