तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 07, 2023
- 311
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोपरी गाव येथे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र विशेष शौचालयाची उभारणी निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील चौथा तर शहरातील पहिला उपक्रम असून मुंबई, पुणे व नागपूर पाठोपाठ आता नवी मुंबई शहरात ही अशा शौचालयाची निर्मिती केली आहे. त्यामुळे येथील तृतीय पांथियांनी समाधान व्यक्त केले आहे.
तृतीयपंथीय नागरिक हा देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहे हे नवी मुंबई पालिकेने नेहमीच लक्षात घेतले असून विविध सामाजिक उपक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग करून घेतलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात 313 सार्वजनिक 297 सामुदायिक शौचालय उभारण्यात आलेली आहेत. नैसर्गिक विधीकरिता तृतीयपंथीयांना पुरुषांसाठीच्या शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तृतीयपंथीय नागरिक ज्या भागत मोठ्या संख्येने एकत्र राहतात अशा ठिकाणी त्यांच्याकरिता स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तुर्भे विभागातील कोपरी भागामध्ये तृतीयपंथीयांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून त्या ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय असावे अशी मागणी केली जात होती. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास निर्देश दिले व कोपरी विभागामध्ये तृतीयापंथासाठी विशेष स्वतंत्र शौचालायची उभारणी करण्यात आली. या विशेष शौचालयाचे लोकार्पण अनिता वाडेकर, मीरा पुजारी, कल्पना पुजारी, बर्लिन, अदा झा या तृतीयपंथीयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
साधारणतः 9 लक्ष इतकी रक्कम खर्च करून हे 8 बैठकी शौचालय उभारण्यात आले असून त्याबद्दल तृतीयपंथीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत आवश्यक सेवासुविधा पुरविण्यावर नवी मुंबई महानगरपालिका भर देत असून तृतीयपंथाची अडचण लक्षात घेऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र विशेष शौचालय बांधण्याचे आणखी एक उल्लेखनीय पाऊल नवी मुंबई महानगरपालिकेने उचललेले आहे. शहरात इतर ठिकाणी तृतीय पंथीयांची वस्ती पाहता त्याठिकाणी देखील असे शौचालय उभारण्याचा विचाराधीन असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai